खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथे भरविण्यात आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे – शिवसेना पक्ष खारेपाटण विभाग पुरस्कृत भव्य खारेपाटण गाव वाडी मर्यादित पावसाळी रबर बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत काझीवाडी,खारेपाटण हा संघ स्पर्धेचा अंतिम विजेता ठरला असून केदारेश्वर,खारेपाटण हा संघ उपविजेता ठरला आहे.
खारेपाटण येथे भर पावसात प्रथमच भरविण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुंबईस्थित खारेपाटण संभाजीनगर गुरववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिक सतीश गुरव खारेपाटण विभाग शिवसेना युवा सेना प्रमुख तेजस राऊत यांनी केले होते. सलग दोन दिवस दि.१५ व १६ जुलै२०२३ रोजी भरविण्यात आलेल्या या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.
या स्पर्धेचा अंतिम विजेता काझीवाडी,खारेपाटण संघाला रोख रुपये ७००० /- रुपये व आकर्षक चषक व उपविजेता केदारेश्वर, खारेपाटण या संघाला रोख ५००० /- रुपये व आकर्षक चषक शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ नीलमताई पालव यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमास स्पर्धा आयोजक सतीश गुरव,तेजस राऊत, प्रणय उपाध्ये,शिवाजी राऊत,अनंत गांधी, वीरेंद्र चिके,दिगंबर गुरव,शंकरराऊत, संतोष गाठे,गजा राऊत,सौ नंदिनी पराडकर,रवी गुरव,सुजित गुरव, समीर गुरव,सुमित गुरव,चेतन गुरव, निखिल गुरव,प्रज्योत मोहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.













