खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्या प्रयत्नाने पी.एम.किसान योजनेतील वंचित लाभार्त्याना लाभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रधान मंत्री कृषी सन्मान योजना अर्थात पी.एम किसान योजनेतील यादीतून काही त्रुटीमुळे वगळलेल्या वंचित शेतकरी लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा अनुदानाचा मिळणारा लाभ त्यांना मिळावा. याकरिता खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांची फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांना नव्याने यादीत समावेश करून त्वरित लाभ देण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीला यश आले असून,खारेपाटण मधील सुमारे १६० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनाचे अनुदान प्राप्त झाले आहे. याबद्दल खारेपाटण ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


सद्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत कणववलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १००० पेक्षा अधिक वंचित शेतकरी लाभार्त्याना याचा फायदा झाला आहे. याबाबत तत्कालीन कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांच्या मागणीची गंभीरतेने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करत पी.एम.किसान योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल तहसीलदार आर जे पवार यांचे देखील शेतकरी नागरिकांनी आभार मानले आहेत.

error: Content is protected !!