वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील ६५ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी उघड झाली होती. . या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मृत वृद्धेचे नाव जयश्री दत्ताराम साटम असून तिच्या मानेवर , छातीवर हत्याराने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. सोनाळी सरपंच भिमराव भोसले यांच्यामुळे ही घटना निदर्शनात आली. पोलिसांनी रातोरात तपासाची चक्रे फिरून संशयित म्हणुन गावातील एका तरुणाला अवघ्या ३ तासातच ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत खुनाच्या तपासाची दिशा ठरवून स्वान पथकाला पाचारण करण्यात आले .या स्वानाणे संशयित तरुणाच्या घरापर्यंत दिशा दाखवली. रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल ,अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे , पोलीस उपअधीक्षक विनोद कांबळी ,प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. फारणे ,वैभववाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहिती नुसार जयश्री साटम ह्या घरात एकट्या राहायच्या. त्यांचे मूळ गाव वैभववाडीतील नावळे हे होय अनेक वर्षे त्या सोनाळी गावी राहत होत्या .सरपंच भीमराव भोसले हे काही कामा सायंकाळी ७.३० वा. सुमारास साटम यांच्या घरी गेले असता त्यांना जयश्री साटम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला त्यांनी ताबोडतोब शेजार्यांना याची कल्पना देत पोलिसांना खबर दिली. पोलिसांनि तातडीने घटनास्थळी धाव घेत. त्यांना संशयास्पद आढळल्याने त्यांनी श्वान पथकाला बोलवले. संशयास्पद आरोपीला पोलीसांच्या ताब्यात घेतले आहे.