कणकवली (प्रतिनिधी) : बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खट्टे पडले आहेत. खड्ड्यांतून बसचालकांना कसरत करावी लागते. बसमधील प्रवाशांना देखील याचा त्रास होत आहे. तसेच बस जाताना पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहे. तसेच बसस्थानकातील संरक्षण भित देखील कोसळली आहे. बसस्थानकात स्वच्छतेचा प्रश्न देखील गंभीर आहे. आहे त्यामुळे सर्व समस्या सोडविण्यासाठी पुढील १० दिवसात योग्य ती कार्यवाही करावी तसे न झाल्यास युवासेना कणकवली बसस्थानकात धडक देईल असे निवेदन आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.
कणकवली बस स्थानकातील खड्डे 10 दिवसात बुजवा अन्यथा युवा सेना बस स्थानकात धडक देणार












