जयश्री साटम यांच्या निर्घृण हत्येबाबत वैभववाडी वाहतूक महासंघाकडून निषेध

खुन्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी पोलिस प्रशासनाकडे केली मागणी

पोलिस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबाबत केले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सोनाळी येथील कै. जयश्री साटम यांची निर्घृण हत्या करण्यात आली सदर घटनेचा आम्ही वैभववाडी तालुक्यातील वाहतूक महासंघाच्या वतीने निषेध करीत आहोत तसेच या निवेदना द्वारे आम्ही अशी मागणी करू इच्छितो की सदर खुन्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपणाकडून जे करता येईल ते आपण करावे ही नम्र विनंती. तसेच आपण अवघ्या २ते ३ तासात संशयीत गुन्हेगाराला अगदी तत्परतेने ताब्यात घेतले त्याबद्दल आम्ही आपले ही ह्या निमित्ताने अभिनंदन करू इच्छितो अशा आशयाचे निवेदन वाहतूक महासंघाच्या वतीने पोलिस प्रशासनाला देण्यात आले.

error: Content is protected !!