अनिल चव्हाण संत शिरोमणी गुरू रविदास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आले गौरविण्यात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पं स चे सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल भिकाजी चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज संघटनेच्या वतीने संत शिरोमणी गुरू रविदास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते अनिल चव्हाण यांचा ओरोस येथे सपत्नीक सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, महानंदा चव्हाण, चंद्रकांत चव्हाण , राजेंद्र चव्हाण, नामदेव जाधव आदी उपस्थित होते. अनिल चव्हाण हे घोणसरी गावचे सुपुत्र असून सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज संघटनेच्या कणकवली तालुकाध्यक्षपदी त्यांनी यशस्वी काम केले आहे.समाज संघटनेच्या माध्यमातून ज्ञातीबंधवांच्या सुखदुःखात सहभागी असतात. शासकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना शासकीय योजनांचा लाभ समाजातील लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी नेहमीच सहकार्य केले.कोव्हीड काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीही आर्थिकस्वरूपात देणगी दिली होती. समाज संघटनेच्या कार्यासाठी नेहमीच निःस्वार्थी भावनेने केलेल्या कामाची दखल घेत अनिल चव्हाण यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!