मसुरे(प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदिवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या सोसायटीला ओरोस येथील शरद भवन येथे आयोजित जिल्हा बँकेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, रोख रक्कम शेअर्स देवून गौरवीण्यात आले. २०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेने १००% वसूली केल्या बद्दल हा गौरव करण्यात आला. हा गौरव म्हणजे सोसायटी संचालक मंडळ व सर्व सभासदांचा गौरव असून यापुढे सोसायटीला प्रगती पथावर नेण्याचा व उलाढाल वाढवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चेअरमन प्रफुल्ल प्रभू म्हणाले. यावेळी चेअरमन प्रफुल्ल प्रभू, व्हा चेअरमन सतीश बांदिवडेकर, शंकर आईर, शत्रूघन आईर, किरण पवार, सुनील घाडी, प्रवीण नाटेकर तसेच जिल्ह्यात बहुसंख्य सोसायटींचे संचालक चेअरमन उपस्थित होते.