मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्यावतीने वराड गावातील सिध्दी राऊत हिला शिक्षणासाठी आवश्यक असलेला अॕन्ड्राईन मोबाईल देण्यात आला. वराड गावातील आर्थिकदृष्ट्या गरीब परंतु अतिशय हुशार विद्यार्थिनी कु. सिध्दी राऊत ही कुडाळ येथे बारावी सायन्समध्ये शिक्षण घेत आहे. परंतु तिच्याकडे आभ्यासाठी अॕन्ड्राईन मोबाईल नव्हता. त्यामुळे तीने सकल मराठा समाजकडे याबाबत मागणी केली होती. याबाबत समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विचार करुन तीला मोबाईल देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे १ डिसेंबर २०२४ रोजी तीला मोबाईल सकल मराठा समाज कट्टा तर्फे देयात आला. त्यावेळी तीचे वडील साबाजी राऊत, अध्यक्ष डाॕ जी आर सावंत, विष्णू लाड, जयंद्रथ परब, छोटु ढोलम, समिर रावले व वैष्णवी लाड हे समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिध्दी राऊत हिच्या वडिलांनी समाजाचे आभार व्यक्त केले.
सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्यावतीने अॕन्ड्राईन मोबाईल वाटप












