कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील नॅशनल हायवेलगत असलेले श्रीधर नाईक उद्यान हे आबालवृद्धांचे विरंगुळ्याचे ठिकाण आहे.मात्र याच गार्डनमध्ये खाजकुवलीची पिकलेली बोंडे झुलत असून बच्चे कंपनीसह त्यांच्यासोबत येणाऱ्या पालकांनाही याचा त्रास होऊ लागला आहे.नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ याची दखल घेत खाजकुवली मुक्त गार्डन करावे अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.