नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गाव मर्यादित आँनलाईन वक्तृत्व स्पर्धा “माझ्या स्वप्नातील गाव” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम-वैदेही पारकर (नांदगाव), द्वितीय-सलोनी शेलार (ओटव-नांदगाव), तर उत्तेजनार्थ-१) सान्वी सुनिल महाडेश्वर ,२) रुद्र बांदिवडेकर यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ट्रस्ट मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारा मध्ये महाराष्ट्र आरोग्य दुत पुरस्कार नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे तर बिड जिल्हा येथील ज्ञानेश्वर गिरी यांना महाराष्ट्र आरोग्य रत्न पुरस्कार वितरण आज करण्यात आले यात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान, चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नांदगाव सरपंच रविराज ऊर्फ भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच तथा खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर, मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, संचालक मारुती मोरये, रज्जाक बटवाले , ग्रामपंचायत सदस्य संतोष बिडये, कमलाकर महाडिक, कमलेश पाटील,ओटव नांदगाव प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद तांबे, मधली वाडी येथील शिक्षीका राजेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम सुत्रसंचालन राजेश कदम, प्रास्ताविक ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर तर आभार ट्रस्ट संचालक मारुती मोरये यांनी मानले.