आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्ती जाहीर
कणकवली(प्रतिनिधी): शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज बोर्डवे युवासेना शाखाप्रमुख पदी युवानेते कु.स्वप्निल ऊर्फ भैया सुरेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच बोर्डवे गावच्या विकासासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिले.
यावेळी शिवसेना नेते सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अँड.हर्षद गावडे, राजु राठोड, अनुप वारंग, सचिन खोचरे, प्रतिक रासम, बंटी उरनकर, महादेव राठवड, मंगेश शिंदे, रोहीत येंडे, विराज येंडे, अमेय येंडे, शरद साळवी, रणजित साळवी, स्वप्निल खंदारे, पांडू कारेकर आदी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.