खारेपाटण केंद्र शाळेला गट शिक्षण अधिकारी श्री किशोर गवस यांनी दिली भेट

खारेपाटण ( प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला नुकतीच कणकवली पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री किशोर गवस यांनी सदिच्छा भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संजय पवार माजी केंद्र प्रमुख श्री सद्गुरू कुबल आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

     खारेपाटण केंद्र शाळा नं.१ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी गटशिक्षण अधिकारी श्री किशोर गवस यांचे शाळेच्या वतीने पुषपगुच्छ देऊन स्वागत केले. खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ही शाळा महाराष्ट्र शासनाने राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल म्हणून घोषित केलेली शाळा असून येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शाळेतील कार्यरत शिक्षक शालेय कामकाजाबरोबरच अन्य सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शेत्रातील उपक्रम शाळेत राबवित असल्याने विद्यार्थी गुणवत्ता वाढी बरोबर विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास देखील होत आहे.या शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी शिक्षक चांगले कामकाज शाळेत करत असून भविष्यात ही शाळा राज्यात जिल्ह्याचे प्रतिनिधित्त्व करेल असे भावपूर्ण उदगार गटशिक्षण अधिकारी श्री किशोर गवस यांनी यावेळी काढले.  यावेळी उपस्थित श्री केंद्रप्रमुख श्री संजय पवार व सद्गुरू कुबल यांचे देखील शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तर सर्वांनी मिळून शाळेची पाहणी केली. व शाळेच्या काकाजाविषयी समाधान व्यक्त केले.
error: Content is protected !!