मनसेने केला सत्कार
सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपत्कालीन परिस्थितीत रात्री-बेरात्री स्वतः कर्मचाऱ्यांसोबत ऑनफिल्ड उपस्थितीत दाखवणाऱ्या सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचा सावंतवाडी मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी माजी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, आरोस माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नंदू परब, सुरेंद्र कोठावळे, निलेश देसाई, पिंट्या नाईक, ज्ञानेश्वर नाईक, संदेश सावंत, स्वप्निल जाधव आदी उपस्थित होते. तालुक्यात पावसाने कहर करत संपूर्ण सावंतवाडी तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही पूरस्थितीत निर्माण होऊन प्रशासनाकडून आपत्ती प्रतिबंधात्मक उपाय योजना युद्ध पातळीवर करण्यात आल्या. याशिवाय आंबोली घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटनांमध्ये तहसीलदार स्वतः स्पॉटवर पोहचून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आढावा घेत होते. सावंतवाडी मोती तलावात देखील स्वतः उतरलेले दिसून आले होते. सावंतवाडी तहसीलदार श्री. पाटील कार्यालयाच्या चार भिंतीत बसून आदेश न देता व तालुक्याचे प्रशासन प्रमुख म्हणून सर्व ठिकाणी ऑनफिल्ड जाता पहारा देत संपूर्ण तालुक्यात फिरून आढावा घेत होते.













