नाईट लाईफ च्या दुनियेत जगणारे आदित्य,राऊत यांना राहुल गांधी चा “फ्लाईंग किस” योग्यच वाटणार
उबाठा आमदार डॉ.पाटकर, दिशा सालीयान यांच्यावरील अन्यायाची चौकशी करावी अशी मागणी करणार काय ? केला सवाल
कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील “फ्लाईंग किस” मधून त्यांची संस्कुती जगा समोर आली.त्यांचे समर्थन नाईट लाईफ च्या दुनियेत जगणारे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे करत आहेत.त्यांना राहुल गांधी याचे वर्तन बरोबर वाटने साहजिकच आहे. कारण संजय राऊतला फार प्रेम कळत.म्हणून तर महिला चिडल्या की त्यांना धमक्या देत मारून टाकतात.महिलांना अश्लिल शिव्या घालायच्या, त्यांच्या घराबाहेर कुत्रे ठेवायचे ,धमकी दयाची हे प्रेम आहे काय ? उबाठा सेनेचे संजय राऊत हा माणूस राजकारणातला इम्रान हाश्मी झाला आहे अशी घणाघाती टीका भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले,काल संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच ऐतिहासिक भाषण झालं. त्या भाषणाची मिर्ची विरोधी पक्षाला झोंबली.त्याचे परिणाम महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्षात जाणवले.राहुल गांधी यांचे भाषण जे झालं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस असा सवाल करताना आमदार राणे यांनी टीका केली. राहुल गांधी फ्लाईंग किस देत देशभर फिरत होते. महिला खासदारांना फ्लाईंग किस देणं कित पत योग्य आहे. ज्यांना महिला खासदारांना फ्लाईंग किस देणं योग्य वाटत असे उबाठा सेनेचे संजय राऊत हा माणूस राजकारणातला इम्रान हाश्मी म्हणायचं का ? महिला अत्याचाराच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार आज राज्य पालांना भेटणार आहेत. हा मोठा जोक आहे. त्यांनी निवेदनात डॉक्टर पाटकर, दिशा सा यांच्यावर अन्याय झाला त्याची माहिती देवून चौकशीची मागणी करावी.
पत्रकार हल्ल्याबाबत कोणाचं समर्थन करणार नाही मात्र संजय राऊतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना आमदारांवर टीका करण्याचा आधीकर नाही. तुमच्या काळात किती पत्रकारांवर हल्ले झाले.राहुल कुलकर्णी, राहूल जोरी,अर्णव गोस्वामी यांच्यावरील हल्ले कोणी केले हे सर्वांना माहीत आहे.त्यांची मुस्कट दाबी करण्यासाठी पोलिस बाळाचा वापर केलात आणि चुकीच्या पद्धतीने अटक करायला लावली हे सुद्धा माहित आहे.त्यामुळे या विषयी बोलण्याचा राऊत ना नैतिक अधिकार नाही.













