कुडाळ ( अमोल गोसावी ) : बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे बॅ. नाथ पै बी.एड. महाविद्यालय, बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, बॅ नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय व बॅ.नाथ पै कला वाणिज्य आणि महिला महाविद्यालय व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम सौ.निलम पारकर ( निवडणूक नायब तहसिलदार- निवडणूक शाखा -) यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व भारतीय नागरिकांना घटनेने बहाल करण्यात आलेला आहे .तो हक्क बजावता यावा म्हणून 18 वर्षावरील युवक युवती व नागरिकांनी मतदार म्हणून आपलं नाव नोंदविणे आवश्यक असते आणि या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली व बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या सहकार्याने मतदार नोंदणी कार्यक्रम चा कार्यक्रम नुकताच पार पडला.
मतादार नोंदणी करणे ही काळाची गरज आहे; पण अठरा वर्ष वय झालेले तरुण-तरुणी मतदार नोंदणीसाठी निरुत्साही असतात .मात्र ‘सरकार असं नाही पाहिजे सरकार तसं नाही पाहिजे’ यावर निरर्थक चर्चा करण्यात आघाडीवर असतात. मात्र मात्र मतदार होण्यासाठी मतदार म्हणून नोंदणी करणे, त्याचे आय कार्ड प्राप्त करणे …या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात .म्हणून मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कुडाळ तहसीलदार यांच्या पुढाकाराने उचललेले पाऊल खरच सुत्य व कौतुकास्पद आहे. यासाठी अशा उपक्रमांना सहकार्य करायला बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था नेहमीच सहकार्य करत असते आणि या उद्देशाने बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मतदान नोंदणी अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बॅ नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, परिवीक्षाधीन नायब तहसिलदार पूजा अवघडे, निवडणूक कर्मचारी सचिन गवस, वैभव आमरोसकर, प्रथमेश वाईरकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या नेहा महाले ,प्रा.प्रांजना पारकर, प्रसाद कानडे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते उपस्थित होते. नंबर यावेळी सुमारे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून आपली नोंदणी पूर्ण केली.














