शाळा व समाज एकत्र येतात तेथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित :गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे

श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेत ‘आनंद मेळावा’ संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गावातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असून शाळा व समाज एकत्र येते तेथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे निश्चित समजावे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी कोकिसरे येथे केले. ते श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरेच्या रंगमंचावर संपन्न झालेल्या ‘आनंद मेळावा व स्नेहसंमेलन’ कार्यक्रमात बोलत होते.

कोकिसरे येथील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे, श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर कोकिसरे व विद्यामंदिर बांबरवाडी या जिल्हा परिषदेच्या तीन शाळांनी एकत्रित येऊन संयुक्तपणे या आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. सकाळच्या सत्रात विद्यार्थी व आजी -माजी पालक यांच्यासाठी विविध बौद्धिक व मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यासक्रमातील गाभाभूत घटक असलेल्या संविधानिक मूल्यातील ‘भारत देशातील धर्मनिरपेक्षता व विविधतेतील एकता’ या थीमवर आधारित भारत देशात राहणाऱ्या सर्व धार्मियांच्या विविध सणांवर आधारित बहारदार नृत्ये यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केली. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी मतदार जनजागृतीही करण्यात आली. याच कार्यक्रमात विविध स्पर्धांत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी व पालक यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.

आनंद मेळाव्याचे उदघाटन सरपंच अवधूत नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान विचारमंचावर गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, माजी सरपंच दत्ताराम सावंत, ग्रा.पं. सदस्या सोनाली पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बडमे, पोलीस पाटील समिधा सावंत, सुमन धोंडे,माजी सैनिक विनोद आयरे, बंधू वळंजू, भाई मोसमकर, जनार्दन मोसमकर, मारुती वळंजू, शंकर लिंगायत, प्रदीप कडू, राजाराम पालकर,संजय रासम, संजय साबळे,संदीप जांभवडेकर, मुख्याध्यापक सुप्रिया शेट्ये, गजानन टक्के, जयवंत मोरे,शिक्षक योगेश खोसरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रफुल्ल जाधव यांनी केले तर आभार शिक्षक अमोल येनगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तिन्ही शाळांच्या शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, ग्रामस्थ, शिक्षक, आजी- माजी विद्यार्थी या सर्वांनी परिश्रम घेतले.

विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे –
विद्यार्थी गट –
1.बादलीत बॉल टाकणे
(इयत्ता तिसरी चौथी)प्रथम -रिया जाधव द्वितीय -तिर्था गुरव तृतीय -दुर्वेश गराठे (इयत्ता पहिली दुसरी)
प्रथम -ऋषी पाटेकर द्वितीय -इंद्रनील येनगे तृतीय -रुद्र पाटेकर
2.पुठ्ठा शर्यत (इयत्ता -तिसरी,चौथी)
प्रथम -तनया बाणे द्वितीय – सायली राशीवटे तृतीय – सार्थक वळंजू
(इयत्ता पहिली, दुसरी) प्रथम – राशी गावडे द्वितीय – मनस्वी जाधव तृतीय – ऋषी पाटेकर 3.बॉटल उचलणे
प्रथम -भाग्येश सावंत द्वितीय – आर्यन चव्हाण तृतीय – रिद्धी पाटेकर 4.फुग्याने ग्लास उचलणे प्रथम – तीर्था गुरव द्वितीय – वेदांत मेणये तृतीय – सार्थक वळंजू
पालक गट –
1.बादलीत बॉल टाकणे प्रथम – सुप्रिया शेट्ये द्वितीय – श्रुतिका सावंत
तृतीय – समिधा सावंत 2. संगीत खुर्ची
प्रथम – जान्हवी जाधव द्वितीय – सोनाली पवार तृतीय – पूर्वा गुरव
3.मेणबत्ती पेटवणे प्रथम – जयप्रभा गुरव द्वितीय – पूर्वा गुरव
तृतीय – पल्लवी जाधव 4.पुठ्ठा शर्यत
प्रथम – पूर्वा गुरव द्वितीय – सलोनी सावंत तृतीय – सुजाता गुरव
5.फुग्याने ग्लास उचलणे प्रथम – शोभा गुरव द्वितीय – अश्विनी गुरव तृतीय – समिधा सावंत.

error: Content is protected !!