खारेपाटण ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

गावातील सर्व जि.प.शाळा मध्ये सी सी टी व्हि कॅमेरे बसविले

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच महेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व जिल्हा प्राथमिक शाळांतील इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नुकतेच सी सी टी व्हि कॅमेरे ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोग निधीतून बसविण्यात आले. खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१, रामेश्वर नगर खारेपाटण जि.प.शाळा, टाकेवाडी संभाजी नगर जि.प. शाळा, हसोळ टेंब कोंडवाडी जि.प शाळा, काझीवाडी जि.प.उर्दू शाळा, बंदरगाव जि.प.उर्दू शाळा तसेच खारेपाटण किल्ला परिसर आदी ठिकाणी हे सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले. खारेपाटण मधील सर्व जि.प प्राथमिक शाळाना सी सी टी व्ही बसवून दिल्याबद्दल सर्व शाळेतील शिक्षकांच्या वतीने ग्रामपंचायत खारेपाटण चे आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!