सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ प्रशांत मोघे यांच्या हस्ते होणार उदघाटन
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ आदित्य शेळके यांचे शेळके हॉस्पिटल आजपासून बालरुग्णसेवेत दाखल होत असून सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रशांत मोघे यांच्या हस्ते आज सायंकाळी 5 वाजता उदघाटन होणार आहे.जेष्ठ फिजिशियन डॉ बी जि शेळके यांचे चिरंजीव असलेले डॉ आदित्य शेळके यांनी एम बी बी एस नंतर डॉ आदित्य यांनी एम डी पीडियाट्रिक ही लहान मुलांच्या आजारांबद्दल ची डिग्री संपादित केली असून 1 वर्ष निओनॅटालॉजी फेलोशिप पूर्ण केली आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ आदित्य स्वतःचे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी उभारले असून त्यात नवजात शिशुंसाठी अत्यावश्यक असलेली एन आय सी यु सुविधेसह कावीळसाठी फोटोथेरपी, व्हेंटिलेटर, इन्फ्युजन पंप, मल्टिपॅरा मॉनिटर आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. कणकवली आशिये रोड, मारुती मंदिर नजीक हे सुसज्ज हॉस्पिटल आजपासून बालरुग्णसेवेत दाखल होत असून यामुळे कणकवली शहराच्या दर्जेदार आरोग्यसेवेत भर पडणार आहे.












