” एम पी ” च्या निवडणुकीत बीजेपी वापरणार ” राणे पॅटर्न “

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मध्यप्रदेश राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत.या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश मधील विधानसभा निवडणूक संघटनात्मक बांधणी पूर्वतयारीसाठी भाजपाने आपली टीम एमपी मध्ये पाठवली असून त्यात कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या समावेश आहे.कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात आ. नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे घरोघरी नेटवर्क उभारले असून पक्ष संघटना मजबुतीकरण ची आ.नितेश राणेंची मेथड ही हटके अशी आहे. केवळ आपला मतदारसंघ अथवा सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर मुंबई सह अवघ्या महाराष्ट्रात नितेश या नावाची चुंबकीय शक्ती चालते.आ.नितेश राणेंच्या संघटन कौशल्यगुणांची पारख करत भारतीय जनता पार्टी कडून त्यांचा समावेश एमपी मधील विधानसभा निवडणूक संघटनात्मक बांधणी पूर्वतयारीसाठी च्या मार्गदर्शक आणि आढावा टीम मध्ये करण्यात आला आहे. यासाठी एमपी मध्ये गेलेल्या आ.नितेश राणे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे हे भोपाळ मध्ये विमानतळावर पोचले असता एमपी मधील भाजपाचे नेते राहुल राजपूत यांनी त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!