कणकवलीतील संगीततज्ञ कै. निवृत्ती दाभोळे यांच्या पाचव्या स्मृतिदिनी गंधर्व फाउंडेशन तर्फे आयोजन!
कणकवली (प्रतिनिधी): संगीततज्ञ कै. निवृत्ती दाभोळे यांनी कणकवलीत राहून अनेक वर्ष संगीत सेवा केली, अनेक गुणी शिष्यांना संगीत मार्गदर्शन केले. त्यासोबतच त्यांचा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक माणसांशी स्नेह जोडला गेला होता. म्हणूनच त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा व सिंधुदुर्गतील कलावंतांना दर्जेदार मंच मिळावा या भावनेतून गेले ५ वर्ष हा स्मृती संगीत सोहळा गंधर्व व दाभोळे शिष्य परिवार आयोजित करीत आहे. यावर्षी हा समारोह २० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ या कालावधीत श्री दत्तक्षेत्र आशिये येथे आयोजिला आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील तरुण कलावंत आपली कला सादर करणार आहेत. सुरुवातील कु. काव्या गौंडळकर, कु. पर्णा नायगावकर, कु. अनुष्का आपटे, कु. पारवी नायगावकर यांचे भावगीत भक्तीगीत गायन होणार आहे. त्यानंतर कु. स्वरांगी गोगटे हिचे शास्त्रीय गायन व अभंग नाट्यसंगीत सादरीकरण होणार आहे. गायनानंतर कु. वेदांत कुयेस्कर याच्या तबला सोलो वादनानंतर कु. हर्ष नकाशे याचे शास्त्रीय गायन व सोबत नाट्यगीत अभंग गायन हि होणार आहे. या गायन मैफिलीला सुरेल संवादिनी साथ संदीप पेंडुरकर, धनंजय प्रभुदेसाई तसेच तबलासाथ अरुण केळुसकर, कु. वेदांत कुयेस्कर करणार आहेत. खऱ्या अर्थाने सांगीतिक श्रद्धांजली ठरणाऱ्या या संगीत महोत्सवात कणकवलीत रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून गायन वादनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गंधर्व फौंडेशन चे अध्यक्ष अभय खडपकर यांनी केले आहे.