जिल्ह्यात रिक्त असलेली पोलीस पाटील पदे तात्काळ भरणार
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाबाबत सातत्याने आवाज उठवीत उपोषण करण्याचा तसेच झोप काडू आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. राऊत यांच्या मागणीची अखेर प्रशासनाने दखल घेत जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील संवर्गाची सुधारित बिंदूनामवली तयार करून लवकरच सर्व पोलीस पाटील पदे तात्काळ भरण्यात येणार असल्याची माहिती स्वतः माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी दिली.
खारेपाटण गावचे पोलीस पाटील पद हे गेली ५ वर्षे रिक्त असून मोठी लोकसंख्या असलेल्या व पाच महसूल गावांची मिळून मोठी ग्रामपंचायत असलेल्या खारेपाटण गावाला स्वतंत्र कायदा सुव्यवस्थेच्यां दृष्टीने कायमस्वरूपी पोलिस पाटील नसणे हे अशोभनीय आहे.सद्या या गावचा कारभार चींचवली गावचे पोलीस पाटील यांचेकडे देण्यात आला असून आजपर्यंत ते काम पाहत आहेत खारेपाटणसह विभागातील वायगणी, नडगिवे, कुरंगवणे,वारगाव या गावात पोलीस पाटील पदे रिक्त असून कणकवली तालुक्यात देखील अनेक गावात पोलीस पाटील पदे रिक्त आहेत.या सर्व परिस्थितीचा विचार करून खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी कणकवली प्रांताधिकारी यांना दी.१५/७/२०२२ लेखी पत्र देऊन १५ आगस्त २०२२ रोजी उपोषणास बसणार असल्याचे पत्र दिले होते.तर दी.१ मार्च २०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच प्रांत अधिकारी कणकवली यांना पोलीस पाटील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत लेखी पत्र देऊन १० मार्च २०२३ पर्यंत पोलीस पाटील पदे न भरल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दी.१३ मार्च २०२३ रोजी आगळ वेगळ अस “झोप काढू आंदोलनाचा ” करण्याचा इशारा देखील राऊत यांनी प्रशासनाला दिला होता.अखेर खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्या या मागणीला आता यश आले असून लवकरच शासनाच्या वतीने जिल्ह्यातील रिक्त असलेली सर्व पोलीस पाटील पदे भरली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.













