दहशतवाद विरोधी शाखा सिंधुदुर्ग च्या पथकाकडूनही होतोय तपास
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पाकिस्तान चा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा यासह हिंदूंच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट इन्स्टाग्राम वर व्हायरल करणाऱ्या मुस्लिम समाजातील युवतीची सखोल चौकशी कणकवली पोलीस करत असून या घटनेचा तपास सिंधुदुर्ग दहशतवाद विरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांकडूनही केला जात आहे. पाकिस्तानप्रेमी मजकुराची आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट व्हायरल केल्याचा प्रकार कणकवली नजीक च्या कलमठ गावातील मुस्लिम धर्मीय युवतीकडून घडला होता. त्याचा निषेध भाजपा कार्यकर्त्यांनी केला होता. आमदार नितेश राणेंनीही पोलीस ठाण्यात जात त्या युवतीकर कायदेशीर कारवाई ची मागणी केली होती. कणकवलीत घडलेल्या या घटनेची पोलीस दलाने गंभीर दखल घेतली आहे. त्या युवतीचे कुटुंबीय कर्नाटक राज्यातील असून फळविक्री व्यवसायानिमित्त ते कलमठ येथे भाड्याच्या खोलीत राहतात. ती युवती कोणाच्या संपर्कात आहे अथवा होती ? दहशतवादी संघटनेच्या अथवा तत्सम कुठल्या संघटनेशी सोशल मीडियावर कनेक्ट आहे का ? तशी पोस्ट तिने का केली ? त्यावेळी नेमकी तिची मानसिकता काय होती ? अशा अनेक अंगाने त्या युवती ची चौकशी केली जात असून सखोल चौकशीअंती कायदेशीर कारवाई केली जाईल.