कणकवली (प्रतिनिधी): आज रक्षाबंधन दिनाचं औचित्य साधत आयुष्यामती प्रज्ञा वासुदेव जाधव तळवणे यांनी भारतीय संविधानाला च रक्षा धागा बांधला आणी खऱ्या अर्थाने संपुर्ण भारतीय स्त्रियांना त्यांचे मुलभूत अधिकार, मुलभूत हक्क, मनाप्रमाणे जगण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन, लढण्याचं जगण्याचं बळ देणाऱ्या भारतीय संविधानाची रक्षा करण्याचां संकल्प त्यांनी केला. आणि ती जबाबदारी आता तुमच्या माझ्यावर येऊन ठेपलेली आहे. माझ्या सहीत माझ्या भावंडांच ही रक्षण संविधानच करतं.भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपध्दती, अधिकार, सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. भारतीय राज्यघटना ही देशाचा मूलभूत कायदा असून लिंगाच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेने जीवन जगण्याची हमी देतो. महिलांना मानव म्हणून त्याच अधिकार, स्थान मिळवून देण्याच्या महत्वाच्या तरतुदी आपल्या राज्यघटनेत सामावल्या आहेत.
महिलांना समानता व समतेचा अधिकार घटनेने बहाल केला आहे. दुकाने, उपहारगृह, चित्रपटगृहे, तलाव, विहिरी, मंदिरे, स्नानघाट, रस्ते अन्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही महिलांना लिंग, वर्ण-जाती, भाषेच्या आधारावर भेदभाव करून प्रवेश नाकारता येत नाही. महिलांना संपूर्ण विकासासाठी विशेष कायदे वा तरतुदी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सार्वजनिक सोयी सवलती व सरकारी नोकर्यांमध्ये महिलांसोबत लिंगाच्या आधारे भेदभाव करता येत नाही.त्यामूळे भारतीय संविधानच आपला खरा रक्षक आहे त्यालाच आपण रक्षा धागा बांधून संविधान समजून घेतलं पाहिजे असा छान संदेश प्रज्ञा ताई वासुदेव जाधव यांनी या निमित्ताने दिला आहे.
भारतीय संविधानाला बांधली राखी….अनोखे रक्षाबंधन











