गुन्हे टाळण्यासाठी गॅरेज मालक, भंगार व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी – पीआय निळकंठ बगळे

देवगड (प्रतिनिधी) : देवगड : देवगड तालुक्यात सार्वजनिक जनजागृती व्हावी या अनुषंगाने शहरातील सर्व दुचाकी, चारचाकी, भंगार व्यावसायिक, मोटर वाहन एजंट यांची संयुक्त बैठक पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी देवगड पोलीस ठाण्यात घेतली.देवगड तालुक्यात मागील 2 दिवसांत विजवीतरण च्या तारा आणि मोटरसायकल ची चोरी झाली.हा चोरीचा माल चोरट्यांनी भंगार व्यावसायिकाला विकला. या दोन्ही चोरीचा छडा देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अगदी 24 तासांच्या आत लावून चोरांना तर पकडलेच सोबत मुद्देमाल सुद्धा जप्त केला.अशा गुन्ह्यात चोरीचा माल खरेदी केल्याबद्दल नाहक भंगार व्यावसायिक सुद्धा गुरफटले जातात.भंगार व्यावसायिकांनी व्यवसाय करताना कोणती खबरदारी घ्यावी ? दुचाकी चारचाकी गॅरेज मेकॅनिकल ने दुरुस्ती साठी आलेल्या गाड्यांबाबत कोणती दक्षता घ्यावी ? मोटर वाहन एजंट ने खरेदी विक्री करताना वाहनांच्या कागदपत्राबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन पोलीस निरीक्षक बगळे यांनी केले. या मार्गदर्शनामुळे आम्ही यापुढे सतर्क राहून खबरदारी घेऊ अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.

error: Content is protected !!