गणेशोत्सव काळात अधिक सतर्क राहा – पीआय निळकंठ बगळे

देवगड (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची सहविचार बैठक देवगड पोलीस ठाण्यात संपन्न झाली.यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी गणेशचतुर्थी सणा दरम्यान पोलीस पाटील यांनी गावात अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासह आपत्ती व्यवस्थापन, परप्रांतीय भाडेकरुंची नोंदणी, नोंदणी न केलेल्या नागरिकांची माहिती गोळा करणे, गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींबद्दल माहिती घेणे, फेरीवाले याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

error: Content is protected !!