कुडाळ (अमोल गोसावी) : डॉ दिपाली काजरेकर लिखित चंद्रदीप काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा सोमवार 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालयात कोमसाप शाखा कुडाळ च्या वतीने करण्यात येणार आहे. जेष्ठ साहित्यिका तथा कोमसाप शाखा कुडाळ च्या अध्यक्षा वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यास अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड.सुहास सावंत प्रमुख पाहुणे असणार आहेत.जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य, कोमसाप महिला साहित्य संमेलनाच्या केंद्रीय समिती प्रमुख उषा परब हे प्रमुख वक्ते असणार आहेत.कोमसाप चे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, एस आर एम कॉलेज चे प्राचार्य डॉ विलास झोडगे, सामाजिक कार्यकर्ते धीरज परब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कोमसाप शाखा कुडाळ च्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ दिपाली काजरेकर लिखित चंद्रदीप काव्यसंग्रहाचा 4 सप्टेंबर रोजी प्रकाशन सोहळा












