जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे एक महिनाभर जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत रेडीमेड गारमेंट (फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण)सुरू करण्यात येणार असून सदर प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र व विद्यावेतन १००० रुपये देण्यात येणार
आहे. तरी ज्या लाभार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरायचे असतील अशांनी सोमवार दि. ४ सप्टेंबर रोजी
सकाळी ठीक ११ वाजता नगरपंचायत वैभववाडी येथे आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला,२ फोटो , नावात बदल असल्यास विवाह नोंदणी
दाखला किंवा गॅजेट अथवा पॅन कार्ड या कागदपत्रांसह नावनोंदणी करावयाची आहे. उद्योग सुरू करण्याची प्रबळ इच्छा, शिक्षण किमान ७ वी पास, वय १८ ते ४५ वर्षे, उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी, कोणत्याही बॅंकेचा/पतसंस्थेचा थकबाकीदार नसलेला. अशा सर्व अटींची पुर्तता करणाऱ्या ३५ विद्यार्थ्यांची मुलाखती द्वारे या प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, बाजारपेठ पाहाणी तंत्र, प्रकल्प अहवाल, उद्योग संधी, विविध शासकीय कर्ज योजना इत्यादींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अधिक माहिती साठी , ऋषिकेश मोरजकर 9096564410, सुधीर नकाशे 7743986088, नेहा माईनकर 7666099479 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे.












