आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील जागृत देवस्थान आई भगवती मातेचा सातप्रहराचा हरीनाम सप्ताह उद्या ४ सप्टेंबर रोजी होत आहे. सकाळी १० वाजता विधीवत पूजा, बारा पाच मानकरी आणि भगवती उत्साही मंडळ यांच्या वतीने गा-हाणे घालून हरिनाम सप्ताहाची सुरुवात, स्थानिक भगवती उत्साही मंडळा कडून हरिनाम सप्ताहास प्रारंभ तसेच संध्याकाळ पासून मंगळवारी सकाळ पर्यंत गावातील व गावाबाहेरील विविध भजनी मंडळाचे भजनी मेळ व सप्ताहाची समाप्ती व महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थिती राहावे असे आवाहन भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी यांनी केले आहे.
चिंदर येथील माऊली मंदिरात उद्या हरिनाम सप्ताह….!












