वाळू माफियांना दणका ; नायब तहसीलदार प्रकरणी 7 आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना आज पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी बुधवार दि.८ फेब्रुवारी पर्यत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी कुडाळ पोलिसांनी केली होती.

पोलीसांनी शनिवारी कुडाळचे नायब तहसीलदार अभिजित हजारे व आंब्रड तलाठी नवीन राठोड यांना मारहाण करणारे आरोपी अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर, अमोल ठाकूर, अंकीत नाईक, स्नेहांकित बांदेकर,वैभव देसाई व जागृत परब या सर्वाना अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी या ७ ही आरोपींना दोन दिवसांची म्हणजेच सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.आज सोमवारी पुन्हा ७ ही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी बुधवार दि.८ फेब्रुवारी पर्यत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी रात्री कुडाळचे नायब तहसीलदारासह आंब्रड तलाठयाला अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर व्यावसायिकांकडून झाली होती मारहाण.

या प्रकरणातील ४ डंपर व इनोव्हा कार, मोबाईल,मोटारसायकल पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चिंदरकर व पोलीस मनोज पाटील हे तपास करीत आहेत.

error: Content is protected !!