वैश्य समाज पतसंस्था बँको पुरस्काराची मानकरी

सलग 6 व्या वर्षी मिळाला सन्मानाचा बँको  पुरस्कार

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था, मर्यादित फोंडाघाटला बँकिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सि इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी नागरी पतसंस्था विभागातून बँको 2022 हा बँकिंग क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत पतसंस्थेचे चेअरमन दिलीप पारकर , व्हाईस चेअरमन, व सर्व संचालक, सरव्यवस्थापक ईश्वरदास पावसकर , सर्व कर्मचारी वृंदाचे अभिनंदन होत आहे. सलग 6 व्या वर्षी वैश्य समाज पतसंस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे. वैश्य समाज पतसंस्थेचा  सातत्यपूर्ण वाढता आलेख, ग्राहकाभिमुख योजना व सुविधा,  ऑडिट वर्ग ” अ ” संस्थेने राखला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच नेट बँकिंग व अन्य सुविधा ग्राहकांना देत आर्थिक व्यवहारात पारदर्शकता वैश्य समाज पतसंस्थेने राखली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा वैश्य समाज पतसंस्थेने उमटवला आहे. याचीच दखल घेत बँको हा पुरस्कार पतसंस्थेला निवड मंडळाने जाहीर केला आहे. 16 मार्च रोजी महाबळेश्वर येथे आयोजित पतसंस्था सहकार परिषदेत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे.

error: Content is protected !!