खेळ पैठणीचा स्पर्धेत नेहा बेबी ठरल्या मानकरी

द्वितीय सुप्रिया सुजित जाधव व तृतीय निलम नामदेव जाधव

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज आयोजित श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सव निमित्त महिलांचा आवडता कार्यक्रम खेळ पैठणीचा सायंकाळच्या सत्रात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सोबत चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, मयुरी चव्हाण, रोशनी चव्हाण, सुप्रिया जाधव , सुभाष भंडारे, महेंद्र चव्हाण, सुनील जाधव, संजीवनी पवार, रोशन जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रायोजकसाठी कणकवलीतील प्रसिद्ध वस्त्रमहाल वोग यांनी आकर्षक पैठणी प्रथम क्रमांक प्रायोजित केली. तर द्वितीय क्रमांकाचे प्रेशर कुकर रोशन जाधव यांनी दिले तसेच तृतीय क्रमांकसाठी sb mobile यांच्या कडून ब्लू टूथ डिव्हाईस देण्यात आले.
खेळ पैठणीचा कार्यक्रम मध्ये ४५ महिलांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. बाळू वालावलकर यांच्या आकर्षक खेळांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रम दरम्यान नगरसेवक ॲड.विराज भोसले व कन्हैया पारकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी पंच म्हणून प्रतीक्षा साटम, दिपाली घाडी, वैदेही गुडेकर, संजना कोलते, दिव्या साळगावकर यांनी काम पाहिले.
पैठणीच्या खेळात महापैठणीची मानकरी ठरल्या नेहा बेबी, द्वितीय क्रमांक बक्षीस प्रेशर कुकर सुप्रिया सुजित जाधव यांना मिळाला, परंतु सामाजिक कार्यात असणाऱ्या सुप्रिया जाधव यांनी आपल्या भागातील जिजाबाई जाधव यांना त्यांनी एकल जीवन जगत आपल्या कुटुंबासाठी भंगार गाड्या भरून आपल्या मुलांना मोठे केले, आजही त्या आपल्या कुटुंबाच्या आधार स्तंभ बनून काम करत आहे त्यासाठी त्यांना आपले बक्षीस त्यांना देऊन त्यांचा सत्कार केला. स्पर्धेतील तृतीत क्रमांक निलम नामदेव जाधव यांना मिळाला. तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने या पुढेही महिलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम करण्याचे आश्वासन मंडळाच्यावतीने सुजित जाधव यांनी दिले.खेळ पैठणीचा स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी व्यासपीठावर शरद जाधव, नामदेव जाधव, अनिल जाधव, राजेंद्र चव्हाण, सुभाष जाधव, प्रकाश वाघेरकर, आनंद जाधव, सी.आर.चव्हाण, रोशन जाधव, अमित जाधव व समाज बांधव उपस्थित होते.खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश आरेकर यांनी केले व निवेदन बाळू वालावलकर यांनी केले.

error: Content is protected !!