युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कुडाळ मालवणमध्ये झंझावाती दौरा

कुडाळ,मालवण तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये युवासेनेच्या कॉलेज कक्षांचे उदघाटन

सिंधुदुर्गातील कॉलेजमध्ये युवासेनेच्या कॉलेज कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा – वरुण सरदेसाई

खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक,अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती

कु़डाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी आज खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ मालवणमध्ये झंझावाती दौरा केला.यावेळी त्यांनी संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ, एम.आय.टी.एम. कॉलेज ओरोस,पॉलिटेक्निक कॉलेज कुंभारमाठ येथे भेट देऊन प्राचार्य यांच्याशी चर्चा केली. या महाविद्यालयांमध्ये युवासेनेच्या कॉलेज कक्षांचे उदघाटन वरुण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी युवासैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

वरुण सरदेसाई म्हणाले,मुंबईतील प्रत्येक कॉलेजच्या बाहेर युवासेनेच्या कॉलेज कक्षाचे एक युनिट आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची जी काही समस्या असेल, प्रश्न असतील त्याचे निवारण करण्याचे काम या युनिटच्या माध्यमातून केले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजच्या बाहेर असे युनिट असावे असा मानस युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातून याची सुरुवात झाली आहे. येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेज मध्ये अशा कॉलेज कक्षाची स्थापना करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यावर युवासैनिकांनी भर द्यावा असे आवाहन वरुण सरदेसाई यांनी केले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना उपसचिव सिद्धेश शिंदे, उपसचिव गीतेश राऊत, उपसचिव अथर्व साळवी, कॉलेज कक्ष प्रमुख नमिता नाईक, विस्तारक अमित पेडणेकर, विस्तारक रुची राऊत, कोकण सचिव मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती मंदार केणी, कुडाळ उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, शहर प्रमुख संतोष शिरसाट,मालवण उप तालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी, सन्मेष परब, कुडाळ उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे,सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, युवासेना समन्वयक सुशील चिंदरकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी,मालवण तालुका प्रमुख मंदार गावडे, मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, अमित भोगले,कुडाळ तालुका समन्वयक योगेश तावडे, संदीप म्हाडेश्वर,सिद्धेश मांजरेकर, स्वप्निल शिंदे,अनुराग सावंत,अमित राणे,दर्शन म्हाडगुत, देवेन ढोलम तेजस्वी परब,निनाक्षी शिंदे, काजल सावंत,छोटू पारकर, बाळा कंदळगावकर, तपस्वी मयेकर,शिवाजी कदम, राहुल परब, आदींसह शिवसेना, युवासेना, युवतीसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!