महिला एसटी कंडक्टरला प्रवाशाची मारहाण

गुन्हा दाखल ; पोलीस कारवाई सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली एसटी स्टँडमधून नरडवे ला जाणाऱ्या एसटी मधील महिला कंडक्टर ला बसमधील प्रवाशाने मारहाण केल्याची घटना रविवार 27 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. अधिक माहिती अशी की, कणकवली – नरडवे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये महिला कंडक्टर माधुरी वंजारे ह्या ऑन ड्युटी होत्या. बसमधील उभे असलेले प्रवासी दिनकर अनंत तावडे ( वय 62, रा. हरकुळ बुद्रुक कसालकरवाडी , ता कणकवली ) यांना कंडक्टर वंजारे यांनी मागील रिकामी सीटवर जाऊन बसा, गाडीला ब्रेक मारला तर पडाल. असे सांगितले. कंडक्टर ने बोलल्याचा राग येऊन दिनकर तावडे याने आपल्या डाव्या हाताच्या थापटाने कंडक्टर वंजारे यांच्या कानशिलात लगावली. अचानक झालेल्या या हल्ल्याने कंडक्टर वंजारे यांच्या उजव्या डोळ्याजवळ दुखापत होऊन डोळा सुजला होता. कंडक्टर वंजारे यांनी या घटनेची कणकवली पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!