खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कनेडी या प्रशालेमध्ये नुकत्याच कणकवली तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील १४ वर्षाखालील मुलांच्या खो-खो संघाने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या संघाची जिल्हास्तरावर होणाऱ्या खो – खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या सांघिक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
खारेपाटण शालेय खोखो संघामध्ये आर्यन जाधव, आर्यन चिके, निनाद तावडे, युवराज खांडेकर, हर्ष गुरव, जय उन्हाळकर, समर्थ लोकरे, मयुरेश दर्पे, सफवान काझी, ताजीम पटेल, मनप्रीत खोसला, समर्थ जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या यशस्वी संघाचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सहसचिव राजेंद्र वरूणकर, खजिनदार संदेश धुमाळे तसेच सर्व संचालक, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, क्रीडाशिक्षक किरसिंग पाडवी व रामदास भिसे, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












