सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : लोखंडी शिंगेने आणि हाताने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी नेल्सन थॉमसझ डांटस (रा कोलगाव,सावंतवाडी) याचा जामीन अर्ज जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी फेटाळला.याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला.नेल्सन डांटस याने फिर्यादी कॅझेटिन ऍलेक्स फर्नांडिस ( रा. चराठा, सावंतवाडी ) याला लोखंडी शिंगेने मारहाण करून त्याचा उजवा डोळा निकामी केला होता.तसेच डाव्या कानाजवळ लोखंडी शिंगेने प्रहार केला होता.फिर्यादी कॅटेझीन आपला जीव वाचवून धावत आपल्या पत्नीच्या ब्युटी पार्लर मध्ये गेला असताना त्याचा पाठलाग करून आरोपी नेल्सन ने तिथेही फिर्यादी ला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 15 एप्रिल 2016 रोजी घडली होती. फिर्यादी नेल्सन ने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी कॅटेझिन वर आयपीसी 307, 326, 325, 452, 324, 506 नुसार गुन्हा दाखल करून त्याला 18 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर सुटका झालेला आरोपी नेल्सन हा न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते.सावंतवाडी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केल्यानंतर नेल्सन हा न्यायालयीन कोठडीत आहे.दरम्यान या गुन्ह्यातील फिर्यादी कॅटेझिन याचा हार्ट अटॅक ने 28 ऑगस्ट 2020 रोजी निधन झाले आहे. आरोपी नेल्सन ने जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता.त्याला हरकत घेताना सरकारी वकील देसाई यांनी आरोपी नेल्सन चा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे.यायाधी जामिनावर सुटल्यावर नेल्सन हा फरार झाला होता, त्याला पोलिसांनी शिताफीने पकडले आहे, आरोपीला न्यायालयीन कोठडीत राहावे लागल्यामुळे त्याचा साक्षीदारांवर राग असून त्याच्यापासून साक्षीदारांना धोका निर्माण होऊ शकतो, आरोपी पुराव्याकामी बाधा आणू शकतो आदि मुद्दे न्यायाधीशांच्या समोर मांडत आरोपी नेल्सन चा जामीन फेटाळण्याची मागणी केली.सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून प्रधान व सत्र जिल्हा न्यायाधीश संजय भारुका यांनी आरोपी नेल्सन डांटस चा जामीन अर्ज फेटाळून लावला.












