वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष व सदस्यांचा जिल्हा भाजपा च्या वतीने सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंत जिल्हास्तरीय निवड समिती गठीत झाल्यावर पहिल्यांदाच ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथील वसंतस्मृती – जिल्हा कार्यालयात कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य हे बैठकी करीता आले असता भाजपा – सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे बुवा, उपाध्यक्ष शैलेश स.जामदार ( वेंगुर्ले ), सदस्य — राजाराम धुरी ( सावंतवाडी ), अजिंक्य पाताडे ( मालवण ), रितेश ग. सुतार ( वैभववाडी ), सौरभ पाटकर ( कुडाळ ) इत्यादींचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे, ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल, वेंगुर्ले ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, अजय घाडीगांवकर आदी उपस्थित होते .

error: Content is protected !!