युवा उद्योजक जय सुहास शेट्ये यांच्यावर वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : शासकीय ठेकेदार तथा युवा उद्योजक जय सुहास शेट्ये यांचा ३२ वा वाढदिवस कणकवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून जय शेट्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत जय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

जय शेट्ये यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी जय शेट्ये यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांनीही जय शेट्ये यांचे अभिनंदन करून त्यांना उत्तम आरोग्य, यश आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी गौरव गवाणकर, नवीन बांदेकर, चिंटू नार्वेकर, रवी बाणे, शिशिर परुळेकर, चंदन पाटील, सुनील काणेकर, अमित मयेकर, सचिन कुवळेकर, हरेश निखार्गे, विनोद भंडारी, बाळा वळशिवडे आदी उपस्थित होते.

मित्रपरिवाराच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले. जय सुहास शेट्ये यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

error: Content is protected !!