कोकिसरे सरपंच पदी भाजपाचे प्रकाश पांचाळ यांची बिनविरोध निवड

वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले पांचाळ यांचे अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपाचे प्रकाश पांचाळ यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. श्री पांचाळ यांच्या निवडीनंतर वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

भारतीय जनता पार्टीच्या पक्षीयधोरणानुसार अवधूत नारकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले होते. दरम्यान प्रभारी सरपंच पदाचा भार लक्ष्मी म्हेत्तर यांनी सांभाळला.

निवडणूक प्रशासनाने बुधवार दि. १३ सप्टेंबर रोजी सरपंच पदाची निवडणूक जाहीर केली होती. सरपंच पदासाठी प्रकाश पांचाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एस. चौगुले यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.यावेळी उपसरपंच लक्ष्मी म्हेत्तर, माजी सरपंच अवधूत नारकर, स्वप्नील खानविलकर, दत्ताराम सावंत, प्रदीप नारकर, समीक्षा पाटणकर, दाजी पाटणकर, विश्वनाथ मेस्त्री, जगन्नाथ गुरव, रमेश गुरव, अमोल जाधव, नंदकुमार आमरसकर, वसुधा आमरसकर,वाडेकर, अशोक जाधव, व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री चौगुले तसेच ग्रामसेवक संभाजी वाघमोडे यांनी काम पाहिले. नूतन सरपंच प्रकाश पांचाळ यांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!