खारेपाटण केंद्र शाळा क्र.१ च्या वतीने स्वच्छता मोहीम

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ च्या वतीने आज रविवारी शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून “एक तारीख एक तास ” – स्वच्छ भारत अभियान उपक्रमात सहभाग घेत शाळेचा परिसर स्वच्छ केला. मा. प्रधानमंत्री नरेंद मोदीजी यांनी भारत देशातील नागरिकांना १ ऑक्टोंबर २०२३ या दिवशी संपूर्ण देशात एकच दिवशी एक तास आपला गाव स्वच्छ करण्यासाठी द्या असे आवाहन केले होते.भारत सरकारच्या या स्वच्छ मिशन उपक्रमाला सहकार्य करत खारेपाटण केंद्र शाळा येथे शाळेचे उच्चश्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण शाळेचा परिसर शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी एकतास श्रमदान करून एकत्र मिळून स्वच्छ केला. यावेळी शाळेचे शिक्षक रेखा लांघी,रुपाली पारकर, अलका मोरे,आरती जेजोन,ज्येष्ठ शिक्षिका स्मिता कोरगावकर,कोंडविलकर सर, अमृता ब्रम्हदंडे,अबिदा काझी यांनी श्रमदानात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!