माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत ने राबवली स्वच्छता मोहीम
कणकवली (प्रतिनिधी): स्वच्छता ही सेवा या देशव्यापी अभियानांतर्गत आज कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून देखील एक तास स्वच्छतेसाठी देत हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे हे स्वतः सहभागी झाले. कणकवली शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप साटम, संदीप सावंत आदी उपस्थित होते.