युरोप मध्ये भरलेय आजीची गोधडी आर्टिस्ट कलेक्टिव्ह प्रदर्शन

सिंधुदुर्ग ची सुकन्या अभया रजनी आणि रजनी कदम या मायलेकींचा कौतुकास्पद उपक्रम

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ वर्दे , कुडाळ येथील अभया रजनी आणि रजनी कदम यांनी ‘गोधडी’ नावाचे आर्टिस्ट कलेक्टिव स्वर्गीय सत्यवती कदम आणि स्वर्गीय सुगंधा कदम यांच्याबरोबर निर्माण केले असून त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन लेबर ऑफ प्रोटेस्टिंग ‘अँटी कास्ट लिनिएज’ हे कोपनहेमन (डेन्मार्क) येथील ‘लॅडर स्पेस’ ह्या गॅलरीमध्ये 28 जुलैपासून लोकांसाठी उघडण्यात आले. ह्या प्रदर्शना मधून अभया रजनीचा दलित स्त्रीवादाचा रिसर्च आणि आर्ट प्रॅक्टिस स्वतःच्या कुटुंबातील स्त्रियांच्या कष्टांमधून, प्रेमामधून आणि जाणीवांमधून सादर करण्याच्या हेतू मधून, त्यांची आई रजनी कदम यांनी बनवलेल्या मसाल्याचा सुवास आजी सत्यवती कदम आणि सुगंधा कदम यांनी बनवलेल्या गोधड्यांची ऊब दी कंटेम्पररी( the contemporary) आर्टच्या व्यापकामध्ये अभ्यासता यावी यासाठी ” या कलेव्हिवची ची निर्मिती करण्यात आली.यानिमित्ताने आजीच्या गोधडीची ऊब आणि मालवणी मसाल्याचा सुगंध थेट वर्दे गावातून परदेशात लंडन मध्ये पोचला आहे. बि. ई. आर्किटेक्ट असलेली अभया रजनी ही सेवानिवृत्त जिल्हा नगररचनाकार अधिकारी साहित्यिक पुरुषोत्तम कदम आणि सेवानिवृत्त बँक अधिकारी रजनी कदम यांची सुकन्या व जेष्ठ पत्रकार माधव कदम यांची भाची आहे.

अभिमानी दलित स्त्री वाद्यांच्या सामूहिक प्रकाशमय शोध घेण्याच्या निष्ठेमधून ह्या प्रदर्शनाची कल्पना निर्माण झाली. लॅडर स्पेस चे संस्थापक अन्डर्स आर्वीक आणि ॲन सोफी मोएलर यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाची बांधणी करण्यात आली गॅलरीच्या मधोमध अभयाचा लेबर ऑफ प्रोटेस्टिंग हे दोन बॅनर मधून स्थापित केलेले आंबेडकरी निळ्या रंगाने बांधले गेलेले इंन्स्टॉलेशन प्रेक्षकांचे स्वागत करत होते. दोन्ही बॅनरवरती मनुस्मृतीचे मंत्र निळ्या रंगाच्या धाग्याने तडाखा मारून उभे होते. दोन्ही भिंतींवर ‘प्रोटेस्ट चान्ट’ हे गोधडीवर विणले गेलेल्या शब्दांचा प्रतिध्वनी प्रसार करत होता. अभया आणि तिचे पार्टनर सहयोगी सॅम मकनील यांनी सिंधुदुर्ग मध्ये ओरोस येथील खरात कुटुंबीयांच्या साथीने बनवलेला ” हा माहितीपट सत्यवती कदम यांच्या गोधडीवर दाखवण्यात आला. या चित्रपटांमध्ये खरात कुटुंब आणि त्यांच्या शेळ्या ओरोसमधील त्यांच्या जीवनातील बदलत्या सामाजिक आणि भौतिक परिदृश्यातून प्रेक्षकांना घेऊन जातात. ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून लॅडर स्पेसने गोधडीच्या पुस्तकाचे प्रकाशन केले असून अभया रजनी आणि रजनी कदम यांच्या लेखणीतून त्यांच्या अनुभवांचा, आठवणींचा आणि रूपकात्मक भौतिकतेद्वारे सादर केलेला दलित स्त्रीवादाचा सिद्धांत मांडला आहे. या प्रदर्शनाची बातमी डेनमार्कमधील ‘आय डू आर्ट’ या न्यूज प्लॅटफॉर्म पहिल्या पानावर झळकली असून या प्रदर्शनासाठी व्हिज्युअल आर्ट कॉसिल वेस्टेर्बा लोकालूडॉल्ग आणि कोपनहेगन मुन्सीपालार्ट यांचे आर्थिक सहकार्यासाठी नेमणूक झाली.


ह्या प्रदर्शनामधील कार्यासाठी लंडनमधील कंटेम्पररी आर्ट संस्था ‘द कॉपल’ प्रोजेक्टच्या आर्टिस्ट रेसिडेन्सीसाठी नेमणूक केली गेली असून 18 सप्टेंबर- 6 ऑक्टोबर पर्यंत ओपन सेल्स या प्रदर्शनामध्ये त्यांच्या नवीन इन्स्टॉलेशन सादर होत आहे. ह्या रेसिडेन्सीमधूनअभायाने ‘एक्स टेंडिंग बॉडीज’ ह्या कार्यशाळेच्या व्यवस्थापनेसाठी नेमणूक झाली. त्याचबरोबर दलित/ बहुजन आंबेडकरी क्युर आणि ट्रान्स लोकांचे सामूहिक संवादासाठी एकत्रित ‘मीट – अप’ अभयाने आयोजित केले. अभया सध्या तिच्या आर्ट प्रॅक्टिस बरोबर किंग्सटन स्कूल ऑफ आर्ट येथे लेक्चरर म्हणून वेगळ्या अध्यापन शास्त्रांद्वारे डिपार्टमेंट ऑफ आर्ट (department of art) येथील विद्यार्थ्यांबरोबर अध्यापन शास्त्रांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत आहे.

error: Content is protected !!