खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी अरुण चव्हाण यांची कणकवली गटविकास अधिकारी (उच्च स्तर वर्ग – १ ) पदी नुकतीच बढती मिळाल्याबद्दल कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी पं.स. कार्यालयात त्यांची सदिच्छा भेट घेऊन खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्राची ईसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे,किरण कर्ले, मनाली होनाळे व ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर यांनी नुकतीच कणकवली पंचायत समिती येथे जाऊन गट विकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून पुढील प्रशासकिय कामकाज वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खारेपाटण हे कणकवली तालुक्यातील महत्वाचे गाव असून जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असणारी मोठी महसुली ग्रामपंचायत असून पंचायत समिती स्तरावर खारेपाटण गावासाठी नेहमीच प्रशासनाच्या वतीने सहकार्य केले जाईल असे आश्वासन यावेळी गट विकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सरपंच प्राची ईसवलकर यांना दिले.
खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने कणकवली गट विकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे अभिनंदन












