गॅस टँकर पलटी होऊन चालक जखमी
कणकवली(प्रतिनिधी) : कणकवली शहरालगत गडनदी पुलावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर आज गुरुवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास गॅसचा टँकर पलटी झाला. यात चालकाला काही प्रमाणात दुखापत झाली. सातत्याने या वळणावर अपघात होत असून, हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरण कडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हे अपघात केव्हा बंद होणार? व यासाठी उपाययोजना होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.












