सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली घाटात घडलेल्या कराड येथील सुशांत खिल्लारे खून प्रकरणाचा सखोल तपास करणाऱ्या सावंतवाडी पोलिसांचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कौतुक केले आहे. सर्व आरोपींना गजाआड करणा-या पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण धन्यवाद देत आहोत, अशाच प्रकारे त्यांनी भविष्यात काम करावे, असे त्यांनी म्हटले. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
श्री साळगावकर यांनी त्यात असे म्हटले की आंबोली घाटामध्ये काही दिवसापूर्वी करण येथील सुशांत खिल्लारे यांचा मृतदेह टाकण्यात आला होता हे प्रकरण सुरुवातीला साधे वाटत असले तरी नंतर यामध्ये अधिक गुंता वाढत गेला होता प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी तपासाची सूत्रे शीघ्र गतीने हाताळत यामधील आरोपींना गजाआड केले. एकूणच पोलिसांचा तपास पाहता हे कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे. यापुढेही पोलिसांनी आपल्या कामगिरीमध्ये असे सातत्य ठेवून उर्वरित प्रकरणाचा ही तपास करावा तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करावा.










