जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबकचे वर्चस्व…!

१७ व १९ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक

कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सिंधुदुर्ग क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या मैदानावर जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले.

चार गटांत झालेल्या या स्पर्धेत प्रशालेच्या मुलींनी १७ वर्षांखालील मुली आणि १९ वर्षांखालील मुली अशा दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे दोन्ही संघांची पुढील महिन्यात होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सपकाळ, संस्थेचे कार्यवाह अरविंद घाडी, संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि पालक यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

खेळाडूंना क्रीडाशिक्षक महेंद्र वारंग तसेच सुरेंद्र उर्फ अन्ना सपकाळ आणि अभिजित धुरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

error: Content is protected !!