इंग्रजी संभाषणासाठी स्वतंत्र डिजिटल ॲप ही नव्या शैक्षणिक क्षेत्राची गरज

शेखर सामंत:- कनेडी हायस्कूल येथे स्मार्ट इंग्लिश साथी ॲप चे उद्घाटन

कनेडी (प्रतिनिधी) : ​शिक्षण क्षेत्रामध्ये दर्जेदार गुणवत्तेबरोबर इंग्रजी संभाषणाचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.इंग्रजी भाषा ही जगाची भाषा आहे. मातृभाषेचा अभिमान ठेवून इंग्रजी संभाषणासाठी स्वतंत्र डिजिटल ॲप ही नवी शैक्षणिक क्षेत्राची गरज कनेडी शिक्षण संस्थेने पूर्ण केली आहे. हा उपक्रम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोहोचण्याची गरज आहे असे मत तरुण भारतचे आवृत्ती संपादक शेखर सामंत यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले.

कनेडी गट शिक्षण संस्थेच्या वतीने स्मार्ट इंग्लिश साथी ॲप विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि पालकांना यामध्ये इंग्रजी संभाषण शिकता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित व्हावे हा हेतू ठेवून संस्थेने हे ॲप तयार केले आहे. प्रशालेचे शिक्षक, संस्थाचालक आणि तज्ञांच्या माध्यमातून हे ॲप विकसित करण्यात आले असून याचे उद्घाटन आज शेखर सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, खजिनदार प्रकाश सावंत,चेअरमन राजाराम सावंत,संस्था संचालक संजय सावंत, व्ही.बी.सावंत ,शालेय समितीचे तुषार सावंत, संतोष सावंत, बावतीस घोणसाल्वीस, चंद्रशेखर वाळके, रायमन डिसोजा, प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेखर सामंत म्हणाले, इंग्रजी भाषा किंवा कुठलीही भाषा ज्या भाषेतून संवाद साधायचा असतो.तो केवळ भाषेतून संवाद नसतो तर ते कौशल्य निर्माण करायचे असते . इंग्रजी ही जगाची भाषा आहे. ही भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे.आपल्याला मातृभाषेचा अभिमान आहे. पण, मातृभाषा जपवताना आपल्याला जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी तर इंग्रजी भाषा येणे अत्यंत गरजेचा आहे. मातृभाषेचा सर्वांना स्वाभिमान आहे आणि तो असायलाच हवा. इंग्रजी भाषा ही आजवर शहरी भागात राहणाऱ्या किंवा इंग्रजी माध्यमांमध्ये अर्थात कॉन्व्हेंट मध्ये शिकणाऱ्या मुलांना येत असे, पण खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड प्रमाणात गुणवत्ता आहे. अशा ग्रामीण भागातील मुलांनी ठरवले तर आज इंग्रजी सारखी भाषा आपण चांगल्या पद्धतीने आत्मसात करू शकतो आणि हे खऱ्या अर्थाने कनेडी गट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या माध्यमातून सुरू झाले आहे. केजीएसपीएम इंग्रजी संभाषण साथी ॲपच्या माध्यमातून हे करण्यात आले आहे .हा मोठा अभिमान आहे. मुलांच्या भवितव्यासाठी ग्रामीण भागात हा सुरू केलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. संस्थेचे विचार आणि स्वप्न निश्चितपणे साकार होईल. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हा विषय पोहोचण्याचा माझा ही प्रामाणिक प्रयत्न राहतील असे मत ही शेखर सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.

ते म्हणाले, या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश करतात माझ्या लक्षात आले की खरोखर इथे वेगळं काहीतरी होत आहे. अनेक उपक्रम या शाळेमध्ये राबवले जात आहेत. ग्रामीण ग्रामीण भागातील या शाळेमध्ये इतके उपक्रम राबवणे हे तितकेसे सोपे नाही. पण सतीश सावंत यांची क्षमता मला माहित आहे. त्यांनी हे सगळं उभं केलं आहे. इंग्रजी संभाषणाचे हे सुंदर असं ॲप्स आपण बनवलं ते अतिशय योग्य पद्धतीचे आहे. अगदी स्पर्धेच्या युगामध्ये मुलं टिकतील अशा पद्धतीने हे ॲप आपण बनवले आहे. या शाळेमध्ये विविध उपक्रम सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून ही संभाषण कौशल्याची पद्धत आपण प्रत्यक्षात उतरवलात हे कौतुकास्पद आहे. मी माझ्या पत्रकारितेच्या जीवनात अनेक गावांना अनेक व्यक्तीना भेटी दिल्या .अनेक ज्येष्ठावंत,श्रेष्ठ शास्त्रज्ञान पासून सामान्य गरिबापर्यंतच्या अनेक मुलाखती घेतल्या.हअनेक भाषांमध्ये त्या समजून घेतल्या. पण, आज येथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने शैक्षणिक संकुलन कसे असावे. हे मला प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. तुमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागतो. याहीपेक्षा तुमच्या शाळेतली मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात आहेत.हेच कौतुकास्पद आहे. शिक्षणामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील मिळणारे शंभर टक्के गुन्हा पेक्षा, तुमचे कौशल्य काय आहे. ते तुम्ही कसे आत्मसात करता आणि लोकांसमोर कसे मांडता याला अधिक महत्त्व आजच्या जगामध्ये आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जर आपल्याला जगायचे असेल, शिकायचे असेल व्यवसाय करायचा असेल तर खऱ्या अर्थाने ही ग्लोबल लँग्वेज म्हणजे इंग्रजी भाषा आली पाहिजे आणि संस्थेने हा केलेला उपक्रम मला अतिशय आवडला असे मत ही शेखर सामंत यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत ही शैक्षणिक संकुलनातील विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. प्राचार्य सुमन सावंत यांनी या ॲपसाठी संस्थेचे संचालक डॉ. सागर सावंत यांनी तांत्रिक बाबीचे मार्गदर्शन केले. त्यांचा यात सर्वाधिक वाटा आहे असे मत व्यक्त केले.यावेळी प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!