जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत नाधवडे माध्यमिक विद्यालयाची वेलांकिनी अटकेकर प्रथम

शाळा व्यवस्थापन समिती व प्रशालेच्या वतीने वेलांकिनीचे केले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडेची विद्यार्थिनी वेलांकिनी दिपक अटकेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिची विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे तिने मागील वर्षी देखील तिने भालाफेक स्पर्धेत जिल्हात प्रथम क्रमांक पटकावला होता. तिच्या या यशाबद्दल तीचे प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!