ज्युबिन नौटियाल च्या लाईव्ह परफॉर्मन्स अनुभवण्याची सुवर्णसंधी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : विशाल परब यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात साजरा होणार असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त साव॑तवाडी सुप्रसिद्ध गायक जुबीन नोटीयाल येणार असून तरी या कार्यक्रमाचा सावंतवाडीकरांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केला.
दरम्यान या कार्यक्रम पाहण्यासाठी बॅण्डची व्यास्ता करण्यात आली आहे. परंतु जरी कोणाला बॅण्ड मिळाला नसता तरी आणि त्या लोकांसाठी व्यवस्था केली असल्याचा देखील परब यांनी यावेळी सांगितले.
तसेच याकरिता प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शोला तब्बल ५० हजार लोक उपस्थित राहणार असून जिल्ह्यावाशियांनी या कार्यक्रमाचा लाभ उठवावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा भाजपा उपाध्यक्ष संजू परब यांनी केले.












