भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले नियुक्ती पत्र
भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष तथा प्रभारी बाळा गोसावी यांची प्रमुख उपस्थिती
ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गेले दोन वर्ष भाजप भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असणारे नवलराज विजयसिंह काळे यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप जिल्हा कार्यालयात निवडीचे पत्र दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी बाळा गोसावी, आमदार निरंजन डावखरे यांचे निकटवर्तीय वैभव साटम,श्री भामरे जिल्हा कार्यालय संपर्कप्रमुख समर्थ राणे वैभव दळवी व इतर उपस्थित होते. काळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे.













