कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने कुंदेवाडी येथे नवरात्राेत्सवाचे आयाेजन

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील कुंदेवाडी येथील सागर गवाणकर यांच्या घराजवळील पटांगणावर कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार दि. 15 ऑक्टाेबर ते साेमवार 23 ऑक्टाेबर या कालावधीत नवरात्राेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे.यानिमत्त राेज सायंकाळी मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम,स्थानिक भजने,दांडीया आदी कार्यक्रम हाेणार आहेत.

कार्यक्रमांचा लाभ तरंदळे गावातील ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन कुंडेदेव युवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!